धाराशिव वाशी=वाशी =वाशी तालुक्यातील इंदापूर येथे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास इंदापूर येथील बस स्टॅन्ड वर फिर्यादी प्रशांत दत्तात्रय कदम यास स्विफ्ट गाडीत नेऊन आरोपीनी गैर कायद्याची मंडळी जमवून यातील फिर्यादीस मागील भांडणाच्या कारणावरून तू आमचे विरोधात काम करतो असे कारण काढून फिर्यादी स्विफ्ट डिझायर गाडीत घेऊन जाऊन शिवीगाळ करत काठी, हॉकी स्कीट ,वायर व लोखंडी रोडने मारून गंभीर जखमी केले होते. फिर्यादीस वाशी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारादरम्यान दाखल केले होते येथून जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे रेफर करण्यात आले होते फिर्यादी याने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी वाशी येथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबतची फिर्याद दाखल केली. यावरून आरोपी महेश महादेव गपाट, शुभम रविकांत गपाट ,रोहन मधुकर गपाट ,प्रणव प्रभाकर गपाट ,रमेश उर्फ पिंटू पाटील महादेव साहेबराव गपाट, कैलास संतोष डोके, पृथ्वीराज रमेश पाटील ,अशोक रामेश्वर गपाट ,उमेश हनुमंत गपाट सर्व राहणार इंदापूर तालुका वाशी व गणेश संजय शिंदे राहणार बावी तालुका वाशी यांच्यावर भारतीय संविधान चे कलम 118 ( 2), 137 (2), 89 (2), 191 (2), 190 ,352 नुसार वाशी पोलीस निरीक्षक थोरात साहेब यांच्या आदेशाने दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीक तपास पोलीस हे.कॉन्स्टेबल जाधवर बी . बी करत आहेत. या अगोदर फिर्यादी प्रशांत दत्तात्रय कदम यांच्यासह ऋषीराज युवराज गपाट, हिंदू राज दिलीप गपाट, बापू नरहरी गपाट यां चार जनावर विनयभंगाचा गुन्हा .दिनांक 7 फेब्रुवारी रोजी वाशी पोलीस स्टेशन येथे दाखल झाला होता. विनयभंगाच्या प्रकारनातूनच मारहाणीचा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे आता परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे काही काळ भांडणे तंटे यापासून गाव शांत होते व गावातील जनता ही तणाव मुक्त होती . पण या दोन प्रकरणामुळे व सत्ता पिपासू राजकारण्यांच्या पक्षीय वर्चस्ववादामुळेपुन्हा इंदापूर येथे गावामध्ये सामान्य जनतेच्या मनावर वागण्यावर तणाव निर्माण होत आहे. गावातील जनतेने सामान्य लोकांची कामे, गावचा विकास , सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जातीय सलोखा, गावात खेळीमेळीचे वातावरण ठेवणे, निवडणुकीपुरते राजकारण करणे अशी कामे करण्यासाठी निवडून दिलेले असते. पण सत्तेत बेधुंद झालेल्या राजकारण्यांना समाजातील वाईट घटना करणाऱ्यांना शासन देण्याऐवजी पाठीशी घालण्यात येते. यामुळे गावातील ऐक्य धोक्यात येऊ शकते. संत तुकाराम महाराजांनी म्हटले होते “भले ही देवू काशेची लंगोटी नाठाळाच्या माती हाणूकाठी ‘ !! याचा या राजकीय पुढाऱ्यांना विसर पडला आहे का असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहे.
मुख्य संपादक विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी वाचा
प्रगत किसान न्यूज
डिजिटल प्रिंट मीडिया 🌻