धाराशिव वाशी=शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी . याबाबत अधिकृत वृत्त असे की मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेच्य सुमारास इंदापूर येथील फिर्यादी 19 वर्षीय तरुणीचे घरी तरुणी एकटी असल्याचे पाहून इंदापूर येथीलच आरोपी क्रमांक 1 याने फिर्यादीस माझे सोबत लग्न कर असे म्हणाला. तरुणीने नकार दिला. नकार देताच तरुणीच्या अंगाला झोंबा झोंबी करत लज्जा वाटेल असे कृत्य केले. तसेच परत गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते अडीच च्या सुमारास फिर्यादी तरुणी ही एकटी घरी असताना मुख्य आरोपीसह इतर तीन आरोपींनी संगणमत करून बोलेरो गाडी क्रमांक. MH 47 6869 मध्ये येऊन तरुणीच्या अंगास झोंबा झोंबी करून लज्जा वाटेल असे कृत्य केले. या पिढीत 19 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून चार जनावर भारतीय दंड विधान कलम 74 ,75(2),(3),351(2),(3),3(5) नुसार 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वाशी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक थोरात साहेब यांनी दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत साहेब करत आहेत.
मुख्य संपादक =विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र🌻
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल, प्रिंट मीडिया.🌻