कारखान्यात स्फोट पाच जखमी
धाराशिव वाशी =बुधवार दिनांक 29 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पेडी शेजारील सीएम दारूवाले उर्फ (पापा) यांच्या मालकीच्या बाबा फायरवर्क्स या फटाका कारखान्यात मोठा स्फोट झाला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. पण पाच जखमी झाले आहेत .यामध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश त्यांना धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कारखान्यातील मजूर दुपारी जेवणाच्या सुट्टीत स्फोट झालेल्या खोलीसमोर जेवण करत होते. तेस्फोटामुळे जखमी झाले.त्या खोलीमध्ये गंधक सोडा व इतर फटाके बनविण्याचे कच्चे मटेरियल ठेवण्यात आले होते. ही खोली साध्या पत्र्याची बनवली असून ही खोली सुरक्षित असली पाहिजे असे पंचनामा व पाहणी करण्यात आलेल्या तलाठी तसेच वाशी तहसीलदार मेहेत्रे साहेब म्हणाले.स्फोटामुळे या खोलीच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या आहेत. बाहेरील शेजारील शेती बांधाला आग कशामुळे लागली व या रूम पर्यंत येऊन स्पोट झाला याचे नक्की कारण कळू शकले नाही . तेरखेडा येथे गेले दहा वर्षापासून अनेक वेळा विविध उपायोजनाचा अभाव निष्काळजीपणामुळे या ना त्या कारणामुळे स्फोट झाले आहेत व अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासाठी तेरखेडा येथील फटाका उत्पादकाची सर्व सोयी सुविधा असलेली एमआयडीसी ची मागणी शासनाकडे व विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधीकडे बऱ्याच वर्षापासून आहे पण ती आज तगायत पूर्ण झालेली नाही निवडणुका पुरते या फटाका उत्पादकांना आश्वासन दिले जाते व पुढे या याकडे दुर्लक्ष केले जाते. या उद्योगामुळे तेरखेडा गावासह वाशी तालुक्यातील लोकांना रोजगार मिळाला आहे तसेच येथील लोकांचे जीवनमान ही उंचावण्यात मोठा वाटा या उद्योगाचा आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर महाराष्ट्राची मिनी शिवकाशी म्हणून तेरखेडा येथील फटका उद्योगाची ओळख आहे.

मुख्य संपादक=विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातमीसाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल, प्रिंट मीडिया🌻