तीन महिला जबर जखमी
इंदापूर येथे सशस्त्र दरोडा तीन महिला जबर
जखमी
धाराशिव वाशी =रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी मध्यरात्री दोन ते तीन च्या सुमारास अज्ञात चार शशस्त्र दरोडेखोरांनी इंदापूर येथील प्रल्हाद कवडे यांच्या घराच्या दरवाजावर थाप मारून घरामध्ये असलेली मुलगी संतोषी जागी झाली व दरवाजा उघडला दरवाजा उघडताच लोखंडी रॉड ने तिच्या डोक्यात मारण्यात आले व अंगावरील सोन्याचे हिसकावून घेतले व तिच्या आईला पण मारहाण केली व अंगावरील सोन्याचे दागिने घेतले. तसेच शेजारी राहणाऱ्या रुक्मिणी रामचंद्र काशीद या आरडाओरड झाल्यामुळे बाहेर आल्या त्यांना पण लोखंडी रॉडने हातावर जबर मारण्यात आले .तसेच घरातील दोन पत्र्याच्या पेट्या यामध्ये पैसे दोन लाख रुपये व कपडे होते ते चोरटे एकूण सोने दोन तोळे 9 ग्राम व रोख रक्कम दोन लाख रुपये असे दोन लाख 58 000 चा मुद्देमाल घेऊन पळाले. सखोल तपासासाठी वाशी पोलिसांकडून सपोनी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक तसेच फॉरेन्सिक पथक मागवण्यात आले होते. फॉरेन्सिक पथकाने घरातील एका मोबाईल व घराच्या हँड ड्रॉप वरील ठसे घेतले असून. श्वान पथक चोरी झालेल्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर इंदापूर तेरखेडा रोडवरील सह्याद्री हॉटेलपर्यंत जाऊन थांबले. दरोडेखोर तेथून चार चाकी वाहनातून पसार झाले यामुळे श्वान पथक तेथेच थांबले. घटनास्थळास वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक थोरात साहेब, सोपोनी सावंत साहेब, इंदापूर बीट अंमलदार जाधवर साहेब यांनी पहाणी केली. संतोषी करडे हिच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनी सावंत साहेब करत आहेत.

मुख्य संपादक विलास गपiट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया