डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात व्याख्यान.
पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
धाराशिव वाशी= सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी वाशी येथील कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 28 वा नामविस्तार दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते तसेच सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार यांचाही सन्मान करण्यात आला अध्यक्ष स्थानि कॉलेजचे प्राचार्य अरुण गंभीरे मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक लक्ष्मण धावारे, ज्येष्ठ पत्रकार बळीराम जगताप गुरुजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रयतेचे राजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य पत्रकार तथा मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर, शिक्षण महर्षी कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार बळीराम जगताप सर यांनी आपले विचार मांडताना पत्रकारांनी निर्भीड व सकारात्मक तसेच अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी काम केले पाहिजे. आपल्या लेखणीच्या शस्त्रातून समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे. यावेळी दैनिक एकमतचे पत्रकार एम आय मुजावर यांनी सध्याच्या काळात लोकशाही टिकवायचे असेल तर लोकांनी फुले, शाहू ,आंबेडकर यांची शिकवण व विचार घेऊन पुढे येण्याची गरज आहे . सध्या देशात अविश्वास व अस्थिरता चे वातावरण आहे नागरिकांनी याचा विचार करणे गरजेचे आहे.नाहीतर देश रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही असे विचार मांडताना सांगितले.
प्रा.लक्ष्मण धावारे व्याख्यान=त्याकाळी उच्च शिक्षण घेण्यासाठी हैद्राबाद येथील उस्मानिया युनिव्हर्सिटी (विद्यापीठ) येथे जावे लागत असे. मराठवाडा हा मागास विभाग असल्यामुळे येथे शिक्षणाच्या फारशा सोई नव्हत्या त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याकाळी छत्रपती संभाजी नगर येथे प्रथमतः मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली जेणेकरून गोरगरीब व सामान्य विद्यार्थ्यांना अल्प दरात उच्च शिक्षण घेता येईल. तसेच तेथे विद्यापीठाची स्थापना व्हावी ही डॉक्टर आंबेडकर यांची इच्छा होती. म्हणून नामंतर चळवळीमधील लोकांची इच्छा होती की या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान असल्यामुळे त्या स बाबासाहेबांचे नाव द्यावे. हा संघर्ष बराच काळ चालला 1994 मध्ये शरद पवार यांनी अखेर दोन्ही विधिमंडळात ठराव पास करून नाम तर नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नाम विस्तार केला. यासाठी नऊ जणांचे बलिदान केले असल्याचे धावरे यांनी सांगितले तसेच आंबेडकरांनी या विद्यापीठास माझे नाव द्यावे असे कधीही सांगितले नव्हते असे त्यांनी यावेळेस सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण गंभीरे यांनी आपले विचार मांडताना पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्यामुळेच त्यांच्या लेखणीतून अन्याविरुद्ध वाचा फोडली जाते व न्याय मिळतो. शासनाचे धोरण योजना पोहोचवण्याचे काम पत्रकार करत असतो. या कार्यक्रमास पत्रकार बळीराम जगताप, एम आय मुजावर, शहाजी चेडे, दादासाहेब लगiडे, विलास गपाट, शोएब काजी तसेच प्राध्यापक एमडी उंद्रे, प्रा रवी चव्हाण, प्रा आनंद करडे, प्रा नवनाथ झेंडे, प्रा बालाजी देवकते,प्रा कृष्णा थोरात, स्वप्निल शेळकांदे, चंद्रकांत घाडगे, मुकुंद कोळी यांच्यासह महिला प्राध्यापक उपस्थित होत्या.