धाराशिव वाशी=सोमवार 6 जानेवारी 2025
व्हॉईस ऑफ मीडिया वाशी च्या वतीने पत्रकार दिन साजरा. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दि.6जानेवारी रोजी वाशी येथे व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. 26 जानेवारी १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.गोविंद कुंटे (भाऊ महाजन) यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.
त्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे. समता आणि व्यक्तिस्वातंत्र्य यावर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी काम केले. दर्पणच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करण्यात आले.
वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्त्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. 1832 मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले.
6 जानेवारी रोजी बाळशास्त्रीं जांभेकर यांनी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केले.. त्याचे स्मरण म्हणून आपण 6 जानेवारी रोजी दर्पण दिन किंवा पत्रकार दिन साजरा करतो.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया वाशीचे अध्यक्ष विलास गपाट, संघटक शोएब काझी(दैं. समय सारथी तालुका प्रतिनिधी वाशी), वैभव पारवे (एम. एच.25 न्यूज), राहुल शेळके (दै.जनमत वाशी तालुका प्रतिनिधी),दत्तात्रय भराटे, विकास भराटे, आदेश कुरुंद, मिसबा काझी, ऍड, एस.आर्.देशमुख मॅडम, सोनाली शिंदे, सटवाईवाडीचे माजी सरपंच योगीराज फरताडे, गोजवडा चे युवा नेते मनोज पाटिल व इतर पत्रकार बांधव, यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी वाशी येथील दिवंगत जेष्ठ पत्रकार तथा वाशीचे माझी पोलीस पाटील हारुण भाई काझी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मुख्य संपादक विलास गपाट
प्रगट किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया