आमदार तानाजीराव सावंत यांच्या पुतण्याला जीवे मारण्याची धमकी. महाराष्ट्रात कायद्याची भीती राहिली नाही

Spread the love

माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी,वाशी तालुका शिवसेनेकडून निवेदन देऊन निषेध.
धाराशिव/ वाशी =मंगळवार दिनांक 24 डिसेंबर.महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा भूम परंडा वाशीचे विद्यमान आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याने वाशी तालुका शिवसेनेच्या वतीने या धमकीचा जाहीर निषेध करून आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीचे निवेदन वाशीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना वाशी तालुका शिवसेनेच्या वतीने देण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक बावीस डिसेंबर रोजी तेरणा सहकारी साखर कारखाना ढोकी तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी अज्ञात व्यक्तीकडून एका ट्रॅक्टर चालकाकडे बंद लिफाफा देऊन तेरणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना देण्यास सांगितले होते.ही घटना 22 डिसेंबर रोजी घडली होती या लिफाफ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा भूम परंडा वाशीचे विद्यमान आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत व केशव सावंत यांना बीड जिल्ह्यातील सरपंच कै.संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच तुम्हालाही जीवे मारले जाईल अशा आशयाचे धमकीचे पत्र सावंत परिवार ला आले होते या घटनेच्या निषेधार्थ वाशी तालुका शिवसेनेच्या वतीने आज वाशी येथे तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी वाशीचे तहसीलदार, तसेच वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन या घटनेचा तात्काळ तपास करून आरोपीवर कडक कार्यवाही करण्यात यावी तसेच धनंजय सावंत व केशव सावंत यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच लवकरात लवकर गुन्ह्याचा तपास करून संबंधित गुन्हेगारावर कार्यवाही झाली नाही तर वाशी तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. या निवेदनावर वाशी तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख सत्यवान गपाट,युवा सेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले,तालुका संघटक शिवहार स्वामी, नगरपंचायत गटनेते नागनाथ नाईकवाडी,शहर प्रमुख सतीश शेरकर, शिवसेना उप तालुका प्रमुख विकास तळेकर, युवा सेना तालुकाप्रमुख प्रवीण गायकवाड, उद्धव साळवी,बाबासाहेब कांबळे,संभाजी शिंदे,विकी चव्हाण,राहुल आडमुटे,संदीप घुले, प्रकाश शेटे,मदन मुरकुटे,लायकभाई तांबोळी,श्रीकांत पाटील,अरुण निरगुडे,दत्ता जाधव,माऊली देशमुख, वैभव जाधव,दत्ता जाधव,विवेक जाधव,राजाभाऊ सुकाळे,दीपक शिंदे मारुती शिरसागर,पोपट मोरे,अशोक लाखे,बालाजी नकाते,सोमनाथ जाधव,अक्षय क्षीरसागर,रंजीत भैरट,सचिन गरड, राजाभाऊ जोगदंड,भागवत मोरे, समाधान मोटे,पोपट सुरवसे,अशोक जाधव,तानाजी कोकाटे,युवराज चेडे,हर्षल उंद्रे,रामराजे सातपुते,दिनकर शिंदे,विलास खवले, बाबासाहेब हारे,दीपक आखाडे, चेतन तातोडे, राजाभाऊ सावंत, आदी वाशी तालुक्यातील शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक=विलास गपाट

🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र

निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी

वाचा प्रगत किसान न्यूज

डिजिटल प्रिंट मीडिया,🌻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!