प्रा. तानाजी सावंत यांचा निसटता विजय

Spread the love

धाराशिव/ वाशी=शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी चा निकालात माजी मंत्री प्रा तानाजीराव सावंत यांचा निसटता विजय झाला. याबाबत अधिकृत असे की 243 वाशी भूम परंडा मतदारसं घाट शिवसेना शिंदे गट उमेदवार तानाजी सावंत व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राहुल मोटे यांच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढती कडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. सुरुवातीपासूनच पोस्टल मतदान मध्ये राहुल मोठे हे 356 मतांनी आघाडीवर होते. विजय उमेदवार तानाजी सावंत यांना1लाख 3 हजार254 तर राहुल मोटे यांना 1 लाख 1 हजार 745 मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण रण बागुल यांना तिसऱ्या क्रमांकाची 12 698 मते मिळाली तर आरोग्य दूध राहुल घुले यांना 21 70 मते मिळाली. तानाजी सावंत यांचा 1509 मतांनी निसटता विजय झाला. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीच्या तोंडावर वाशी, पारा, इंदापूर ,तेरखेडा आधी दवाखान्याचे श्रेणी वर्धन करण्यात आले होते तसेच वाशी येथे एमआयडीसी तेरखेडा येथे फटाका क्लस्टर आधी घोषणा करण्यात आल्या होत्या तसेच उजनीचे पाणी एप्रिल 2025 पर्यंत आणणार असे सावंत यांनी सांगितले होते अशा विविध घोषणांच्या अनुषंगाने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. मत मोजणी च्या सुरुवातीपासूनच वाशी भुम तालुक्यात अत्यंत चुरस झाली 100 =50 फर काने 20 व्या फेरीपर्यंत मागेपुढे लीड होत होती. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये धाकदुख वाढली होती 25 =27 फेरीत परंडा तालुक्यात अखेर तानाजी सावंत यांना अडीच हजार मताची लीड मिळाली . व 1509 मतांनी निसटता विजय मिळाला. सावंत यांनी अडीच वर्षाच्या काळात पाच हजार कोटी निधी मतदार संघात आणला असल्याचे सांगितले होते. एवढा निधी आणला असताना व विकास कामे केली असताना एवढी चुरस झाली. वाशी भूम परंडा मतदारसंघात मराठा आरक्षण चळवळ ची धग जास्त होती याचाही फटका सावंत यांना बसला तर या मतदारसंघातील अनेक दिग्ग ज नेते सावंत यांच्याविरोधात गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले यामुळेच या मतदारसंघात ही चुरस वाढली होती असे जनतेतून बोलले जात आहे.

मुख्य संपादक विलास गपाट

🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र

निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी वाचा
प्रगत किसान न्यूज
डिजिटल प्रिंट मीडिया 🌻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!