धाराशिव=मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी धाराशिव येथे कळम धाराशिव मतदार संघातील उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत वाशी चे शिंदे शिवसेना गटाचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी मा. सभापती माननीय प्रशांत बाबा चेडे यांनी शिवसेना (उबाटा) गटात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत वाशी नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष नितीन चेडे,नगरसेवक बाळासाहेब सुकाळे, नगरसेवक किशोर भांडवले, नगरसेवक दिग्विजय, कृष्णा गवारे, प्रसाद जोशी, जीवनराव भराटे ,गणेश भराटे, नवाब काजी, बाळासाहेब हजारे मुरलीधर बागडे ,नितीन कवडे यांनी प्रवेश केला. यावेळी कळंब येथील माजी नगर अध्यक्ष संजय मुंदडा ,लक्ष्मण कापसे सुधीर भवर ,मंदार मुळीक, यांनी (उबा टा) गटात प्रवेश केला. तत्पूर्वी दिनांक 11 नोव्हेंबर रोजी प्रशांत चेडे यांनी वाशी येथे बालाजी मंगल कार्यालय भव्य असा सस्नेह मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात त्यांनी पुढील दिशा ठरवण्याचे संकेत दिले होते. प्रशांत बाबा चेडे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्यात गेल्या एक ते दीड वर्षापासून वी संवाद झाला होता प्रशांत बाबा चेडे हे नाराज होते. त्यातच मराठा योद्धा,संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यात माननीय प्रशांत बाबा चेडे यांनी वाशी तालुक्यात त उठाव करत मराठा आरक्षणाच्या लढ्यात गेल्या दीड वर्षापासून सहभाग घेतला होता व अंतरवेली येथे झालेल्या बैठकीत लढायचे की पाडायचे यात येणारी विधानसभा निवडणूक लढण्याचे ठरले यावेळी मनोज दादा जरांगे पाटील यांनी ज्याला निवडणूक लढवायची आहे अशा इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरावे असे आवाहन केले होते यात प्रशांत चिडे यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता व त्यांना मनोज रंगे पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळेल अशी आशा होती पण ऐनवेळी सामाजिक समीकरणे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचे ठरवले आणि प्रशांत चेडे यांची निराशा झाली. प्रशांत चेडे यांना शिवसेना (उबा टा) गटाकडून उमेदवारी देण्याचे संकेत ही मिळत होते पण जोपर्यंत जरांगे पाटलाचा निर्णय येत नाही तोपर्यंत शांत राहिले. जंरंगे पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आव्हान केले त्यावेळेस प्रशांत चेडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यांचे वाशी भूम परंडा तालुक्यात चाहाता वर्ग आहे कार्यकर्ते आहेत .ते प्रशांत चे डे यांना काहीतरी निर्णय घेण्याचे सारखी विनंती करत होते. आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वाशीनगरपंचायत, साखर कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती. यामुळे पुढील वाटचाल करण्यासाठी प्रशांत चेडे यांनी शिवसेना उबाठा गटात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यामुळे वाशी भूम परंडा मतदारसंघात आगामी निवडणुकीत उभे असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तानाजीराव सावंत यांना मतदानiस काही दिवस बाकी असताना, जवळ आले असताना चांगलाच झटका बसल्याचे बोलले जात आहे. प्रशांत बाबा चेडे यांच्या निर्णयाने महाविकास आघाडीचे पारडे आता जड झाले आहे. वाशी भूम परंडा 243 मतदार संघात प्रशांत चेडे किंगमेकर ठरणार यात शंका नाही. प्रशांत चे डे च्या या भूमिकेमुळे तानाजीराव सावंत यांना सोपी वाटणारी निवडणूक आता तारेवरची कसरत झाली आहे. प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राहुल मोटे यांची आता या मतदारसंघात ताकद वाढली आहे यामुळे आता कडवे आवाहन उभे राहिले आहेत. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रवीण रण बागुल यांचाही प्रचाराचा झंजावात सुरू आहे यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार आहे .आगामी काळात काय होणार . जनतेचे मतदार संघातील प्रश्न, पाणी, वीज, उद्योगधंदे नसणे , मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाशि भूम परंडा मतदारसंघात जास्त आहे.असे अनेक प्रश्न या मतदारसंघात प्रलंबित आहेत.जनता जनार्दन येणाऱ्या निवडणुकीत कोणास कॉल देते हे बघणं उचित ठरणार आहे.

मुख्य संपादक विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी वाचा
प्रगत किसान न्यूज
डिजिटल प्रिंट मीडिया 🌻