वाशी =बुधवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे होणाऱ्या विराट सभेची तयारी पूर्ण झाली असून या सभेसाठी वाशी तालुक्यातील सकल मराठा बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशांत चेडे यांनी केले आहे. तसेच क्रांतीसुर्य मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागत वाशी तालुका माळी समाज एक टन फुलाच्या हराने करणार असल्याचे श्री चेडे यांनी सांगितले. वाशी येथील सभा न भूतो न भविष्यती होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या सभेसाठी व मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील मुस्लिम बांधव, माळी बांधव ,चर्मकार बांधव, सुतार बांधव ,अशा सर्वच समाजाने पाठिंबा दिलेला आहे व त्या हजारोच्या लाखोच्या संख्येने सर्वजण या सभेस उपस्थित राहणार आहेत .असे माहिती प्रगत किसानसी बोलताना चेडे यांनी बोलताना सांगितले सांगितले.
संपादक =विलास गपाट
निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी संपर्क
9689707384