वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांची रेकॉर्ड ब्रेक सभा

Spread the love

वाशी =बुधवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या प्रांगणावर मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण लढ्याची रेकॉर्ड ब्रेक सभा झाली. 101 जेसीबी च्या साह्याने फुलांची उधळण करत व फटाक्यांचे आतिषबाजी करीत तसेच एक टन वजनाच्या फुलाच्या हराने मराठा योद्धा क्रांतीसुर्य मनोज जारंगे पाटील यांचे जंगी स्वागत माळी समाजाच्या वतीने करण्यात आले तसेच या आरक्षण लढ्यास पाठिंबा देऊन वाशी येथील धनगर समाजाच्या वतीने काठी आणि घोंगडं देऊन त्यांचा सत्कार केला. सकाळी 11 वाजता होणारी सभा सायंकाळी सात वाजता झाली महिला भगिनी आबाल वृद्ध तळपत्या उन्हात दिवसभर बसून राहिले. याविषयी बोलताना माननीय जरांगे पाटील यांनी लाखो उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले व हाच समाज आता पेटून उठला आहे व त्याच्या मनात वेदना घेऊन आलाय म्हणून दिवस भर लोक जागा सोडायला तयार नाहीत. हीच मराठ्यांची ताकद आणि ऊर्जा मला मिळत असल्यामुळे मी दिवस रात्र हा आरक्षणासाठीचा लढा लढत आहे आणि म्हणूनच मी माझ्या गरीब गरजवंत मराठ्यांशी गद्दारी करू शकत नाही. यावेळी बोलताना पाटील म्हणाले आपलेच सरकारमधील काही मंत्री आपल्याच मराठ्याच्या पोरांना आपल्या विरुद्ध लढण्यास उभे करत आहेत. यामुळे मराठ्यांनो आपली एकजूट अशीच राहू द्या आपल्यामध्ये मतभेद होऊ देऊ नका मी आरक्षण तुमच्या पदरात टाकल्याशिवाय शांत बसणार नाही. यावेळी काही मराठा आमदार खासदार मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका मांडताना दिसतात त्यांनाही मनोज पाटील यांनी पैसा आणि सत्तेचा माज दाखवू नका नाहीतर गाठ आमच्याशी आहे असा इशाराही त्यांनी दिला. तसेच मराठा गोरगरिबांना आरक्षण मिळण्याचा अंतिम टप्पा आला असताना यास आरक्षणासाठी नाही काय करता आलं तरी गप्प बसण्याचा सल्ला त्यांनी दिला गरीबाच्या पोरांचं वाटोळ करू नका असे पाटील म्हणाले. तसेच शासनात 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण देण्याच्या अल्टिमेटम त्यांनी दिलेला असून शासनाने 24 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण द्यावे आता मराठ्यांचा अंत पाहू नये असे सरकारला ठणकावले. तसेच एक डिसेंबर पासून साखळी उपोषण संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येईल व 24 तारखे ला आरक्षण नाही दिले तर मुंबई ला सव्वा दोन कोटी मराठा मुंबई बघायला येथील यांच्या……. ची सोय शासनाने करावी. चा इशाराही त्यांनी दिला यावेळी लाखोच्या संख्येने धाराशिव जिल्ह्यातून वाशी येथे महिला शाळकरी मुले वृद्ध जनसमुदाय जमला होता वाशी येथील ही ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक सभा झाली आहे. मराठा समन्वय समिती वाशी भांडवले सर सुरेश बाप्पा कवडे प्रशांत बाबा चेडे विकास मोळवणे प्रशांत कवडे एडवोकेट सांडशे नागनाथ नाईकवाडी नितीन चेडे भागवत कवडे यांच्यासह सर्वपक्षीय सर्व जाती-धर्माच्या बांधवांनी या सभेचे उत्कृष्ट नियोजन करून सभा यशस्वी पार पाडली यासाठी सकल मराठा समाज वाशी तालुक्याच्या वतीने त्यांच आभार मानण्यात आले.

संपादक =विलास गपाट

निर्भीड व सकारात्मक बातम्यासाठी संपर्क

9689707384

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!