धाराशिव/वाशी=24/2/2024 वाशी तालुक्यातील इंदापूर जिल्हा परिषद प्रशालेने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात प्रथम क्रमांक पटकावला असून या बक्षिसाची रक्कम तीन लाख रुपये असणार आहे. तालुकास्तरावर गटविकास अधिकारी श्री नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यांकन समिती गठित करण्यात आली होती. तालुक्यातून एकूण 74 शाळेचे मूल्यांकन करण्यात आले सहा केंद्रातून प्रथम आलेल्या शाळेचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनातून वाशी तालुक्यातून जिल्हा परिषद प्रशाला इंदापूर या शाळेस प्रथम क्रमांक मिळाला. याचे इंदापूर ग्रामस्थांकडून व शिक्षण प्रेमी नागरिकाकडून शाळेचे मुख्याध्यापक भायगुडे सर ,सहशिक्षक जगताप सर ,चव्हाण सर ,गायकवाड सर कुरवलकर सर सुकाळे मॅडम सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेऊन शाळेत मिळवून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व कौतुक केले. यावेळी सरपंच गणेश गपाट, सत्यवान गपाट, हिंदूराज गपाट, सतीश पारडे ,विलास गपाट, रामेश्वर काकडे आदी उपस्थित होते.
मुख्य संपादक विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया