धाराशिव वाशी.दि.27/2/2024
खानापूर येथील दलित बांधव पाण्यासाठी करणार आमरण उपोषण
वाशी तालुक्यातील खानापूर येथील दलित वस्ती मध्ये सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असून पाण्याची तीव्र टंचाई आहे. खानापूर गावामध्ये सध्या एक कुपनलिकेला पाणी आहे. पण पाणी सोडण्याच्या ग्रामपंचायतीच्या नियोजना अभावी दलित वस्ती मधील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे पाण्यासाठी एक किलोमीटर वरून भटकंती करावी लागत आहे याविषयी वारंवार ग्रामसेवक सरपंच यांना कल्पना देऊन सांगून ही दलित वस्तीमध्ये पाणी येत नाही दुर्लक्ष केले जात आहे. याला कंटाळून दलित वस्ती येथील नागरिकांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना आमरण उपोषण साठी दिनांक 27 रोजी निवेदन दिले आहे . यामध्ये असे म्हटले आहे की 5 मार्च पर्यंत सुरळीत पाणी दलित वस्तीमध्ये नाही आले तर महिला, वृद्ध, लहान मुलासोबत घागरी ,हंडा, कळशी, बकेट घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण 6 मार्चपासून करण्यात येणार आहे. या निवेदनावर संदेश लगाडे, बालाजी लगाडे, महेश लगाडे, परमेश्वर भालेराव ,नितीन लगाडे आकाश लगडे, रंजीत लगडे आधी दलित वस्ती मधील नागरिकांच्या सह्या आहेत.
मुख्य संपादक विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया