वाशी =दि.6/4/2024 याबाबत अधिकृत वृत्त असे की धाराशिव जिल्ह्यामध्ये होत असलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला डावलून महायुती मधील वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी डावलून भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या वाशी तालुक्यातील शिवसैनिकांनी महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा निषेध करत तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीच्या फॉर्मची होळी करण्यात आली.तसेच झालेल्या बैठकीमध्ये सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भावना व्यक्त करत महायुती सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी अजूनही वेळ न घालवता सदरची जागा शिवसेनेला सोडून घ्यावी, किंवा उमेदवार बदलून विजयी होणारा उमेदवाराला उमेदवारी द्यावी. अशी मागणी केली.तसेच भविष्यात जर महायुतीचा उमेदवार पराभूत झाला तर याला धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक जबाबदार असणार नाहीत.अशी भावना तालुक्यातील पदाधिकारी यांनी व्यक्त केल्या.त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक माननीय नामदार तानाजीराव सावंत साहेब हे जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य आहे व ते जो आदेश देतील तो आम्ही पाळणार असून ते सांगतील ते काम करण्याची ही भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावरून आगामी लोकसभा निवडणुकीत वाशी तालुक्यातील शिवसेना शिंदे गट महायुतीचा धर्मपाळतील काय? शिवसेना पदाधिकारी यांनी आक्रमक होत महायुतीचा उमेदवार पडला तर आमची जिम्मेदारी नाही असे वक्तव्य यांनी केलेले आहे याबाबत जनतेत संभ्रम झाल्याचे चित्र पाहावयास मिळते.या बैठकीला शिवसेना वाशी तालुकाप्रमुख सत्यवान गपाट, युवासेनेचे युवा जिल्हाधिकारी बाळासाहेब मांगले, माजी नगराध्यक्ष नागनाथ नायकवाडी,उपतालुकाप्रमुख विकास तळेकर,सतीश शेरकर शहर प्रमुख वाशी युवा सेना तालुकाप्रमुख प्रवीण गायकवाड, उपतालुकाप्रमुख स्वप्निल कोकाटे,सुनील मोरे,रंजीत घुले नितीन रणदिवे अतुल चौधरी अशोक लाखे उद्धव साळवी शरद मनगिरे बालाजी नकाते दिनकर शिंदे नाना घुले सुनील जाधवर सोमनाथ शिंदे सुनील उंद्रे राजाभाऊ सुकाळे तुकाराम वीर संदीप लाखे राजाभाऊ जोगदंड तानाजी कोकाटे मुजमील पठाण राजाभाऊ कोळी राजाभाऊ सावंत विनोद खोसे दत्ता जाधव नामदेव लहाने विलास खवले महेश कोकणे बाबासाहेब हारे बाबासाहेब कांबळे लायक तांबोळी प्रवीण शेटे मदन मुरकुटे बप्पा शिंदे अक्षय मेटे अभिषेक गवारे दत्ता चौधरी नंदू सुकाळे बाबू तावरे अक्षय चव्हाण मोहन दळवे पोपट उघडे अजय देशमुख अक्षय चव्हाण राजेंद्र सुकाळे उमेश सानप मच्छिंद्र सारूक राहुल घोळवे तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया