निष्ठा काय असते गद्दारी काय असते याचा प्रत्यय आला ओमराजे निंबाळकर

Spread the love

धाराशिव= मंगळवार दिनांक16/4/2024 महाविकास आघाडीचे उमेदवार मा. खासदार ओमराजे निंबाळकर यांचा धाराशिव लोकसभा साठी उमेदवारी अर्ज धाराशिव शहरातून भव्य रॅली काढून शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून दाखल करण्यात आला .यावेळी महाविकास आघाडीचे सर्व तरुण युवा नेते आमदार रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, आमदार अमित देशमुख काँग्रेस, माजी मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, आमदार कैलास पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख शंकरराव बोरकर यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होतेउपस्थित होते यावेळी प्रस्तावित भाषणात धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भाषणात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे नाव न घेता जहरी टीका केली. एकनिष्ठ राहिल्यामुळे कुठल्याही चकरां न मारता माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेचे तिकीट दिल पण गद्दारी करणाऱ्यांन तासन तास उमेदवारीसाठी ताटकळत बसून सुद्धा उमेदवारी मिळाली नाही. यावरून गद्दारी व खुद्दारी काय असते याचा प्रत्यय त्या दोन दिवसात आला. महाराष्ट्रातील ही गद्दारी काढण्यासाठी आदित्य ठाकरे साहेब आज धारा शिव जिल्ह्यात आले आहेत. त्यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ,पदाधिकारी लाखोच्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक विलास गपाट

प्रगत किसान प्रगत राष्ट्र

निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी

वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!