धाराशिव =मंगळवार 16/4/2024 रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार मा खासदार ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला यावेळी घेण्यात आलेल्या सभे प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी केंद्र सरकारवर व राज्य सरकारवर टीका केली. यावेळी ते म्हणाले देशातील व राज्यातील जनता या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळले आहे . देशात या पूर्वी असे कधीही घडले नव्हते लोकांना याचा वीट आला आहे. शेतकरी ,सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सत्ताधारी सत्तेत बेधुंद आहेत जनतेचे त्यांना काही देणे घेणे नाही हे सर्व बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना बहुमताने निवडून द्या असे यावेळी मतदारांना आवाहन केले.
मुख्य संपादक विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया