धागाशिव=मंगळवार 16/4/2024 रोजी धाराशिव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येथे झालेल्या प्रचंड सभेत आपल्या भाषणात केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या धोरणावर टीका करत शेतकरी विरोधी धोरण असणाऱ्या भाजप सरकारला खाली खेचून जय जिजाऊ जय शिवराय केंद्र सरकारला देणार महाराष्ट्र पर्याय अशी घोषणाही त्यांनी केली. यावेळी देशातील महागाई, वाढती बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या शेतमालाला भाव नाही पंजाब हरियाणा येथील शेतकरी हमीभावासाठी शेतकरी प्रश्नावर,आंदोलन करत असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे लाठी चार्ज करणे अशा सरकारला खाली खेचा त्यांचे भाषण चालू असतानाच सभेतील उत्साही कार्यकर्ते आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे नाव न घेता खेकड्यावर बोला खेकड्यावर बोला असे ओरडत होते यावेळी आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता खेकडा खेकडा नका करत बसू उगीच नका लायकी नसलेले चे महत्व वाढवत बसू खेकड्याची नांगी आपणाला पण मोडता येते असे बोलून कार्यकर्त्यांना शांत केले. यावेळी आमदार अमित देशमुख, आमदार रोहित पवार, आमदार कैलास पाटील, संपर्कप्रमुख शंकरराव बोरकर महा विकास आघाडीतील सर्वपक्षीय पदाधिकारी लाखोच्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक विलास कपट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यासाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल व प्रिंट मीडिया