धाराशिव =29/4/2024 रोजी धाराशिव येथे क्रांतीसुर्य मराठा योद्धा जरांगे पाटील नारायण गड येथे होणाऱ्या 900 एकर महासभेच्या जनजागृतीसाठी प्रचार रथाचे उद्घाटन केले त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना देशाच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रातील स्थानिक भाजप नेत्यामळे दुसऱ्या चिन्हाचा प्रचार करण्याची वेळ आली तसेच जिल्ह्या जिल्ह्यात सभा घ्यावे लागत आहे . जिथे 88 लोकसभा सीट असणाऱ्या राज्यात एकाच टप्प्यात इलेक्शन घेतले पण महाराष्ट्रात मात्र 48 जागांसाठी पाच टप्प्यात मतदान घ्यावे लागले एवढी वाईट वेळ आली आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते मराठ्यांचा द्वेष करत आहे आम्हाला आरक्षण नाकारल्यामुळेच व मराठा समाजाचे एकजुटीमुळे मोदींना महाराष्ट्रात ठाण मांडून बसवे लागत आहे एवढा वेळ मोदींनी महाराष्ट्रासाठी कधीच दिला नाही हा मराठ्यांचा विजय आहे. सध्या सोयरे ची अंमलबजावणी नाही केली तर याचेही पेक्षा वाईट वेळ भाजपवर येईल असे ते म्हणाले आम्ही एक महिन्यापासून विधानसभेची तयारी सुरू केली आहे मराठा समाजास या सरकारने आरक्षण नाही दिल्यास ताकतीने विधानसभा लढविणार आहे. आम्ही महायुती किंवा महाविकास आघाडी किंवा अपक्ष कोणालाही पाठिंबा दिलेला नाही असेही ते यावेळी म्हणाले. जे संगे सोयरे च्या व मराठा आणि कुणबी एकच आहे याच्या बाजूने राहील त्यांना मतदान करा व जे विरोध करतील त्यांना पाडा. पाडण्यात ही मोठा विजय आहे असे जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी जरंगे पाटील यांचे भव्य असे स्वागत यांच्यावतीने करण्यात आले.
मुख्य संपादक विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड सकारात्मक बातम्यासाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया