धाराशिव वाशी=मंगळवार दिनांक 21/5/2024 रोजी मराठा योद्धा माननीय जरांगे पाटील यांनी इंदापूर येथील जागृत देवस्थान लक्ष्मी नरसिंह यांचे दर्शन घेतले
.धाराशिव /वाशी = इंदापूर येथे मंगळवार दिनांक 21 /5/ 2024 रोजी मराठा योद्धा क्रांतीसुर्य माननीय मनोज दादा जरांगे पाटील हे नरसिंह यात्रेनिमित्त दर्शनासाठी इंदापूर येथे आले होते. मराठा आरक्षणाच्या लढ्यात सुरुवातीपासूनच मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार वेळोवेळी इंदापूर येथे धरणे आंदोलन ,साखळी उपोषण ,आमरण उपोषण ,रस्ता रोको, गाव बंदी अशी अनेक आंदोलने इंदापूरकरांनी केली होती व दादांच्या लढ्यांना खंबीर साथ दिली होती याची दखल घेत व इंदापूरकरांचे प्रेम पाहून मनोज जरांगे पाटील यांनी इंदापूर गावास भेट देण्याचे आश्वासन दिले होते व शब्द दिला होता त्या शब्दाला जागत स्वतः आजारी असताना एक दिवस अगोदर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असताना सुद्धा मनोज दादा समाज बांधवांच्या निमंत्रणाला मान देऊन नरसिंह यात्रेनिमित्त जागृत देवस्थान असलेले नरसिंह मंदिर येथे येऊन नरसिंह चरणी नतमस्तक होऊन येथे जमलेल्या हजारो मराठा बांधव व सर्व समाज बांधव यांच्याशी संवाद साधला यावेळी छोटे खाणी झालेल्या सभेत दादांनी मराठा समाजाला आवाहन केले की चार जूनला मी सग्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी परत एकदा आमरण उपोषणास बसणार आहे तरी सर्व धाराशिव जिल्ह्यातील गावच्या गावांनी आंतरवाली सराटीला येऊन उपोषणास पाठिंबा द्यायचा आहे आपल्या समाजाची लेकर मोठी करायची आहे त. यावेळी बोलताना पाटील समाजबांध वांना सर्व राजकीय पक्षांच्या पुढार्यांचे जोडे उचलणे बंद करा आणि आपल्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी एकत्र होऊन लढा द्या असे आवाहन केले. यावेळी एक मराठा लाख मराठा , जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही समाज बांधवांनी दिल्या. हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.

मुख्य संपादक विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया