धाराशिव/ वाशी=शुक्रवार दिनांक 31/5/2024 इंदापूर येथील जिल्हा परिषद प्रशाले च्या इयत्ता दहावीत विशेष यश संपादन केल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालय इंदापूर यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सत्कार करण्यात आला. यामध्ये समृद्धी चक्रधर गपाट हिने 90.20% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला तर कीर्ती गणेश गायके 83.6% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकायला तर प्रज्ञा पांडुरंग कवडे हिने 81.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. शाळेचा एकूण निकाल 85.71% लागला. यावेळी गावातील काही विद्यार्थी बाहेरगावी शिक्षण घेत आहे त्यांचाही यावेळी गुणगौरव करण्यात आला यामध्ये संध्या प्रकाश गपाट 97.80%, ज्ञानदीप बालाजी पार्टी 97%, सोनल बालाजी काळे 94%, कृष्णा गोकुळ गपाट 85%, करण कैलास गोरे 85%, अजिंक्य पांडुरंग पारडे ८६%, धवलसिंह गणेश उकंडे 86% सीबीएससी, साक्षी बालाजी माळी 84%, विजय विनोद खंडागळे 89% अशा 12 विशेष प्रवीण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी सरपंच गणेश गपाट, ऍड सत्यवान गपाट, मुख्याध्यापक सतीश भायगुडे सर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सतीश भाईगुडे, कुरवलकर सर, चव्हाण सर, जगताप सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हिंदुराज गपाट, उपाध्यक्ष चक्रधर गपाट, रामेश्वर काकडे, प्रकाश गपाट, ग्रामसेवक माळी साहेब यांच्या सह शिक्षणप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यासाठी वाचा
प्रगट किसान डिजिटल प्रिंट मीडिया