इंदापूर नरसिंह कारखान्याजवळ टायर फुटल्याने ट्रकने घेतला पेट
इंदापूर नरसिंह कारखान्याजवळ टायर फुटून घेतला पेट ट्रक जळून खाक
धाराशिव /वाशी=गुरुवार दिनांक 6 /6/2024 रोजी पारगाव चौसाळा येथून सोयाबीन ने भरलेला ट्रक सकाळी साडेनऊ दहा च्या आसपास इंदापूर येथील नरसिंह कारखान्याजवळ आल्यानंतर टायर फुटल्याने पेट घेतला संपूर्ण ट्रक जळून खाक झाला मात्र यातील सोयाबीन तात्काळ पोलीस यंत्रणेने जेसीबीच्या साह्याने व कळंब येथील अग्निशमन दलाला पाचlरण केल्याने सोयाबीन भरलेल्या सुतळी गोण्यांना लागलेली आग विझवल्यामुळे काही प्रमाणात नुकसान टळले . यावेळी वाशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चोरगे साहेब, पोलीस उपनिरीक्षक घुले साहेब यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा लावली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी बघ्यांची गर्दी खूप जमली होती.
मुख्य संपादक विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया