इंदापूर येथे हॉटेल चालकास मारहाण गंभीर जखमी
वाशी ,=वाशी तालुक्यातील इंदापूर येथे मंगळवार दिनांक 13/ 1/ 2026 रोजी दुपारी अंदाजे बारा ते एक वाजण्याच्या सुमारास आरोपी नामे निलेश लगाडे हा हॉटेल चालक नरसिंग हनुमंत गपाट याच्या हॉटेल हर्षदा या इंदापूर बस स्टॅन्ड चौका त असलेल्या हॉटेलमध्ये आला व हनुमंत कपाट यास मला बाहेर जायचे आहे तू मला कोणाची तरी मोटार सायकल बघून दे. असे म्हणाला पण फिर्यादी नरसिंग गपाट यांनी गाडी देण्यास नकार देताच आरोपीने शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हॉटेल चालक नरसिंग गपाट याच्या डाव्या हाताच्या दंडावर व उजव्या हातावर चाकू मारून गंभीर जखमी केले. याबाबत एम एल सी जबाब पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधवर साहेब /पोलीस कॉन्स्टेबल शेवाळे यांनी पोलीस स्टेशन वाशी येथे हजर केल्याने वाशी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक मा .शंकर शिंदे साहेब यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक भाळे साहेब यांनी भारतीय न्याय संहिता कलम 109 (1), कलम 352, 351(२)(३) नुसार दिनांक 14 /1/ 2026 गुन्हा दाखल करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडके साहेब यांच्याकडे देण्यात आला आहे.
मुख्य संपादक = विलास गपाट
,🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र 🌻
निपक्ष निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी फॉलो करा
प्रगत किसान लाईव्ह फेसबुक, ई न्यूज पोर्टल, प्रिंट मीडिया