धाराशिव/ वाशी=मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 # तेरखेडा जिल्हा परिषद गटात आ .प्रा. तानाजीराव सावंत व राहुल मोटे यांना धक्का#
माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना नेते बिबीशन खामकर यांनी आमदार तानाजीराव सावंत यांची निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडत सावंत यांना धक्का देत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी दाखल केला. तर याच वेळी माजी आमदार राहुल मोटे यांचे विश्वासूव ग्रामपंचायत तेरखेडाचे उपसरपंच कलाम पठाणसर,बालाजीघोलप,यांनी पक्ष श्रेष्ठी साळवी व प्रा तानाजी राव सावंत यांच्या उपस्थित राष्ट्रवादीला सोडचिठीदेत शिवबंधन बांधले .यामुळे तेरखेडा जि.प गटात चुरस वाढलीआहे .
याबाबत अधिकृत असे की गेल्या काही तेरखेडा जिल्हा परिषद गटातून शिवसेनेसाठी बिभीषण अण्णा खामकर हे उमेदवारी मागत होते तसेच याच गटातून शिंदे सेनेकडून विकी चव्हाण हेही उमेदवारी मागत होते पण बिबीशन खामकर यांचा विचार आमदार तानाजीराव सावंत यांच्याकडून झाला नसल्याने व विकी चव्हाण यांची वर्णी लागल्याने नाराज झालेले बिबीशन खामकर यांनी राष्ट्रवादी सोबत जाऊन आज आपला उमेदवारी अर्ज भव्य शक्ती प्रदर्शन करत दाखल केला. यामुळे तेरखेडा जिल्हा परिषद गटात आता भाजप ,शिवसेना, राष्ट्रवादी ,शिवसेना उबटा असा सामना पाहावयास मिळणार आहे.
आज 20 जानेवारी पर्यंत पारगाव जिल्हा परिषद साठी दोन उमेदवारी अर्ज पारा जिल्हा परिषद साठी चार तर तेरखेडा जिल्हा परिषद साठी चार असे एकूण दहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे . तर 6 पंचायत समितीसाठी पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे यात
इंदापूर =एक
तेरखेडा= एक
बावी= एक
पारगाव =एक
सरमकुंडी =1
पारा= 0
मुख्य संपादक = विलास गपाट
,🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र 🌻
निपक्ष निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी फॉलो करा
प्रगत किसान लाईव्ह फेसबुक, ई न्यूज पोर्टल, प्रिंट मीडिया